व्हिक्टोरिया – ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया येथे लागलेल्या आगीत जीवित आणि वित्तहानी झाली आहे. ज्या कुटुंबांचे यात नुकसान झाले आहे, त्यांच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू सज्ज झाले आहेत.
अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस लिन आणि डार्सी शॉर्ट या तिघांनी यांनी या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. बिग बॅश स्पर्धा सुरु असून या तिघा खेळाडूंनी यातील सामन्यात षटकार फटकावल्यानंतर 250 डॉलर्स निधी देण्याचे जाहीर केले आहे. न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरियामध्ये लागलेल्या आगीत सर्वात जास्त नुकसान झाले आहे.