ख्राइस्टचर्च – न्यूझीलंडचा नवोदित आक्रमक फलंदाज लिओ कार्टरने एका देशांतर्गत टी-20 स्पर्धेत एका षटकात सलग सहा चेंडूंवर 6 षटकार फटकावत अशी कामगिरी यापूर्वी नोंदविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळविले. अशी कामगिरी करणारा कार्टर जागतिक क्रिकेटमधील 7 वा फलंदाज ठरला. देशांतर्गत टी-20 स्पर्धेत नॉर्दन नाइट संघाविरोधात कार्टरने ही कामगिरी केली. कार्टरच्या कामगिरीच्या जोरावर कॅंटरबरी किंग्स संघाने विजय मिळविला.
कार्टरने फिरकी गोलंदाज देवसिच याच्या षटकात सलग 6 चेंडूंवर 6 षटकार फटकावले. कार्टरने 29 चेंडूत 70 धावांची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीने कॅंटरबरी संघाने 220 धावांचे आव्हान 3 गडी राखून पूर्ण केले.
36 off an over! ?
Leo Carter hit 6 sixes in a row and the @CanterburyCrick Kings have pulled off the huge chase of 220 with 7 balls to spare at Hagley Oval! ?
Scorecard | https://t.co/uxeeDsd3QY#SuperSmashNZ #cricketnation
? SKY Sport. pic.twitter.com/nuDXdp1muG— Dream11 Super Smash (@SuperSmashNZ) January 5, 2020
भारताच्या रवी शास्त्री आणि युवराज सिंगने एका षटकात 6 षटकार मारण्याची किमया केली होती. यापूर्वी गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, हर्शल गिब्स, युवराज सिंग, रॉस वाइटले आणि हजरतुल्लाह जजई यांनी एका षटकात 6 षटकार ठोकले होते. या यादीत कार्टरचा समावेश झाला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सहा षटकार ठोकणारा कार्टर हा चौथा फलंदाज ठरला आहे.