पिंपरी, (प्रतिनिधी) – व्हेरॉक चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये बुधवारचे (दि. ३) साखळी सामने गोलंदाजांनी गाजविले. ‘केडन्स’चा गोलंदाज प्रसाद आंबले याने पाच तर यजमान ‘व्हेरॉक-वेंगसरकर’च्या आदित्य कापरे याने तीन बळी टिपले. या दोन्ही संघांनी विजय मिळविले. थेरगाव येथील पीसीएमसीज् व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीच्यावतीने १६ वर्षांखालील मुलांसाठी ही स्पर्धा भरविण्यात आली आहे.
पहिल्या सामन्यात ‘केडन्स’ने आर्यन्स अकादमीवर ५४ धावांनी विजय मिळविला. गोलंदाज प्रसाद आंबले हा सामन्याचा मानकरी ठरला. दुसऱ्या सामन्यात यजमान व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीने डेक्कन जिमखाना संघाला ५४ धावांनी मात केली. आदित्य कापरे याला सामनावीराचा बहुमान मिळाला. तत्पूर्वी, मंगळवारी झालेल्या साखळी सामन्यात अष्टपैलू झोराष्ट्रीयन अकादमीने ‘केडन्स’वर ४० धावांनी विजय मिळविला.
‘केडन्स’चा सलामीवीर प्रथमेश लोंढे सामन्याचा मानकरी ठरला. दुसऱ्या सामन्यात २२ यार्डस संघाने पूना क्लबचा ७ गडी राखून पराभव केला. विजयी संघाचा गोलंदाज शिवम गोरे सामनावीर ठरला.