नगर -अहमदनगर होमिओपॅथीक हॉस्पिटल व आरोग्य डॉक्टर ग्रुप यांच्यातर्फे आरोग्य कोविड कक्षाची सुरुवात झाली आहे. या ठिकाणी कोविड बाधित रुग्णांवर विविध तपासण्यावरुन रुग्णांवर वरील तिन्ही पॅथीने उपचार केले जाणार आहेत. सध्याच्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बाधितांना चांगले उपचार मिळणे आवश्यक झाले आहे, अशी भूमिका ड्यॉ भूषण अनभुले यांनी व्यक्त केली.
अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्यावतीने नगर-मनमाड रोड येथे आरोग्य कोविड कक्षाची सुरुवात करण्यात आली. त्या कक्षाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. भूषण चंगेडिया, डॉ. दिलीप पवार, डॉ. विलास सोनवणे, लक्ष्मीनिवास सारडा, राजेंद्र बोरा, मदन क्षत्रिय, शिवाजी रणसिंग आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. समीर होळकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुनील पवार यांनी आभार मानले.