रेडा -पुण्याहून उस्मानाबादला तिघे मोटारसायकलीवरून निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्याने कारने धडक दिल्याने मोटारसायकलीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला तर त्यांची नात गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी 11. 30 वाजता इंदापूर जवळील गागरगाव लोंढेवस्ती येथे घडली. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून कारचालकावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दयानंद कुंडलिक दुपारगुडे (वय 45), त्यांची पत्नी सुवर्णा दयानंद दुपारगुडे (वय 35 दोघे रा. निलेगाव ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तर त्यांची नात वैदिक मनोज दुपारगुडे (वय 2) हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर मयत दुपारगुडे यांचा पुतण्या वैभव शुक्राचार्य दुपारगुडे (वय 18) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, चार मोटसायकवरून एकूण नऊ जण पुण्याहून सकाळी 7 वाजता उस्मानाबादकडे निघाले होते. त्यांना तहान लागली म्हणून ते पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर हद्दीतील लोंढे वस्तीजवळ सकाळी 11. 30 रस्त्याच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी भरधाव वेगाने मागून आलेली पांढऱ्या रंगाच्या कारने (एमएच 04 एचएम 1528) भरधाव वेगात मोटारसायकल दुपारगुडे यांच्या दुचाकीला (एमएच 12 केएफ 5535) धडक दिली.
त्यामुळे दयानंद व सूर्वणा पारगुडे यांना जबर मार लागला होता. तर घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी अपघातग्रस्त कुटुंबाना तात्काळ मदत करीत त्यांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता दुपारगुडे दाम्पत्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या नातीवर उपचार सुरू आहेत.