पिंपरी – दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून घरात घुसून दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना बौद्धनगर, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी घडली.
सचिन श्याम खंडागळे (वय 32) आणि त्यांचा मामेभाऊ रोहित अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. रवी ठोकळ (वय 35, रा. जगताप कॉलनी, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सचिन यांनी शनिवारी (दि. 16) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी ठोकळ याने फिर्यादी सचिन यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने सचिन, मामेभावावरही आरोपीने वार केले.