पुणे – एजीए मॅनेजमेंट आयोजित पहिल्या एमरल्ड करंडक अजिंक्यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत रायझिंग स्टार्स संघाने सलग दुसरा विजय मिळवला. एलके इलेव्हन संघाने पुणे हरीकेन्स् संघाचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म्स मैदानावर झालेल्या या सामन्यात एलके इलेव्हन संघाने पुणे हरीकेन्स् संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पुणे हरीकेन्स् संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 193 धावा धावफलकावर लावल्या. एलके इलेव्हनने हे आव्हान 17.1 षटकात पूर्ण केले.
रायझिंग स्टार संघाने स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रायझिंग स्टार्सने 20 षटकांमध्ये 225 धावांचा डोंगर उभा केला. स्पाटर्न सुपर किंग्ज् संघाला हे आव्हान पेलवले नाही व त्यांचा डाव 17 षटकांमध्ये 123 धावांवर आटोपला.
संक्षिप्त धावफलक – (गटसाखळी फेरी )
1) पुणे हरीकेन्स : 20 षटकात 7 बाद 193 धावा. (विक्रांत बांगर 55, रॉबिन जोशी नाबाद 51, प्रथमेश देशपांडे 32, कपिल गुप्ता 2-29) पराभूत वि. एलके इलेव्हन ः 17.1 षटकात 5 बाद 196 धावा. (शंतनु आठवले 40, निनाद पाठक 32, समीर पंचचोर 36, अपुर्व दराडे 33, प्रथमेश देशपांडे 2-27). सामनावीर : शंतनु आठवले.
2) रायझिंग स्टार्स : 20 षटकात 6 बाद 225 धावा. (निखील जैन 68, कौस्तुभ बाकरे 46, विनोद पवार नाबाद 36, सचिन पिंपरीकर 27, वैनितेया पुरंदरे 3-51). वि. वि. स्पाटर्न सुपर किंग्ज ः 17 षटकात सर्वबाद 123 धावा. (अक्षय माने 25, गिरीष ओक 27, कौस्तुभ बाकरे 3-35, विशाल भैरागडीगकर 3-21). सामनावीर : कौस्तुभ बाकरे.