आदिवासी भागात कापणी केलेल्या भात पिकांचे नुकसान
जुन्नर – जुन्नर परिसरात रविवारी (दि. 26) रात्री आठनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने रात्री उशिरापर्यंत हजेरी लावली. त्यानंतर सलग दुसर्या दिवशी सोमवारी (दि. 27) दुपारी एकनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली.
हिवाळ्यात होत असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रविवारी रात्री जुन्नर परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीचपाणी झालेले होते.
जुन्नर तालुक्याच्या आदिवासी मावळ भागात तसेच पूर्व भागात पावसाचा जोर अधिक होता. आदिवासी भागात सध्या भात कापणी झोडणीची कामे वेगाने सुरू असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या होत असलेल्या या अवकाळीचा फटका द्राक्ष बागांना, कांदा, हरभरा, ज्वारी, टोमॅटो या पिकांना बसलेला असून शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, सध्या लग्नसराई सुरू झालेली असून होत असलेल्या पावसामुळे लग्न मंडपांमध्ये धांदल उडत आहे.
पावासाची नोंद मिमीमध्ये
जुन्नर तालुक्यातील नऊ पर्जन्यमापक केंद्रांवर रविवारी (दि. 26) झालेल्या पावसाच्या नोंदी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे; जुन्नर : 52 , नारायणगाव : 32, ओतूर : 26, वडगाव आनंद : 40 , बेल्हे : 34, निमगाव सावा : 4 , मढ : 35, आपटाळे : 39, आजनावळे : 54
घाटघर (ता. जुनार) : आदिवासी भागात भात कापणी करून ठेवलेली असताना अवकाळी पावसाने झालेले नुकसान.