पुणे – इलेव्हन स्ट्रायकर्स मॅनेजमेंट आयोजित पहिल्या किंग्ज् स्पोर्टस करंडक अजिंक्यपद आंतरक्लब टी-20 क्रिकेट स्पर्धेत हेमंत पाटील क्रिकेट क्लब आणि रिव्हल्युशन्स् स्पोर्टस क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
चांदे येथील इन्फीनिटी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शैलेंद्र कसबे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट क्लबने किंग्ज् स्पोर्टसचा 109 धावांनी धुव्वा उडवून दणक्यात सुरूवात केली. हेमंत पाटील संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 219 धावांचा डोंगर उभा केला.
किंग्ज् स्पोर्टस संघाचा डाव 20 षटकात 8 गडी गमावून 110 धावांवर मर्यादित राहीला. रिव्हल्युशन्स् स्पोर्टस क्लबने वालेकर स्पोर्टस संघाचा 6 गडी राखून पराभव केला. वालेकर स्पोर्टसने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 10 गडी गमावून 127 धावा केल्या. रिव्हल्युशन्स् स्पोर्टस क्लबने 10.1 षटकात व 4 गडी गमावून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
संक्षिप्त धावफलक – (गटसाखळी फेरी) :
1) हेमंत पाटील क्रिकेट क्लब ः 20 षटकात 7 बाद 219 धावा. (विनय पाटील 50, संदीप शिंदे 50, जयेश राठोड 28, रोहन कदम नाबाद 24, सौरव चौघ 3-34, गजानन पट्टेबंदुर 2-35). वि. वि. किंग्ज् स्पोर्टस ः 20 षटकात 8 बाद 110 धावा. (अनिल चौधरी 36, मनिष चौहान 26, शैलेंद्र कसबे 3-10). सामनावीर : शैलेंद्र कसबे.
2) वालेकर स्पोर्टस : 20 षटकात सर्वबाद 127 धावा. (निखील कदम 38, रोहीत खांडेकर 14, आशिष मांडवे 12, किर्तीराज वाडेकर 2-11, अश्विन शिंदे 2-23) पराभूत वि. रिव्हल्युशन्स् स्पोर्टस क्लब ः 10.1 षटकात 4 बाद 131 धावा. (हर्ष संघवी 66, रोहीत गायकवाड 16, निनाद अशोक 15, गणेश जी. 3-26). सामनावीर : हर्ष संघवी.