नवी दिल्ली – देशभरात गेल्या 24 तासांत करोनाचे 38,667 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 478 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (दि. 14) दिली. देशात आतापर्यंत करोनामुळे ऐकून 4,30,732 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाचा वेग मंदावताना दिसत होता. तसेच देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत ही घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा करोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडा वाढला आहे.
India reports 38,667 new #COVID19 cases and 35,743 recoveries in the last 24 hrs, as per Union Health Ministry.
Total recoveries: 3,13,38,088
Active cases: 3,87,673Weekly positivity rate: 2.05%
Total vaccination: 53.61 crores pic.twitter.com/vdJvfzMNYA— ANI (@ANI) August 14, 2021
देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 38 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे देशाचा पॉझिटिव्ही रेट 2.05 टक्क्यांवर आहे.