अभिनेते ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका असलेला “शर्माजी नमकीन’ हा सिनेमा आता रिलीज होणार आहे. त्यामुळे ऋषी कपूर यांच्या चाहत्यांना दिलासा मिळणार आहे.
या सिनेमातील बहुतेक भागाचे शूटिंग पूर्ण झाल्यावर ऋषी कपूर आजारी पडले आणि अमेरिकेत दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर गेल्यावर्षी 30 एप्रिलला त्यांचे निधन झाले होते. तेव्हापासून हा सिनेमा रखडलेल्या अवस्थेत होता.
नंतर निर्मात्यांनी ऋषी कपूर यांच्या रोलसाठी परेश रावल यांची निवड केली. ऋषी कपूर यांचा रोल तसाच ठेवून उर्वरित भागात परेश रावल यांनी काम केले आहे. आता हा सिनेमा रिलीजसाठी तयार झाला आहे. पुढील महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे, असे जुही चावलाने म्हटले आहे.
पुढच्या महिन्यात 4 सप्टेंबरला ऋषी कपूर यांचा स्मृती दिन आहे. त्याच दिवशी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. ऋषी कपूर यांच्या स्मृतिदिनी हा सिनेमा रिलीज करता यावा, या दृष्टीने सर्व शूटिंग वेळेवर पूर्ण झाले आहे, असे निर्माते फरहान अख्तर, रितेश सिधवानी आणि हनी त्रेहान यांनी सांगितले.