मुंबई – संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूवर प्रभावी असं आयुर्वेदिक औषध योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली संस्थेने आज सादर केले. कोरोनाची बाधा झालेला रुग्ण हे औषध घेतल्यानंतर जास्तीत-जास्त ७ दिवसांमध्ये बरे होतात असा दावा देखील करण्यात आला. मात्र रामदेव बाबांच्या या कथित रामबाण औषधाला आता केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने ब्रेक लावला आहे.
डिजिटल प्रभात आता टेलेग्रामवर! जॉईन करण्यासाठी खालील लिंकरवर क्लिक करा https://t.me/edainikprabhat
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज रामदेव बाबा यांच्या पतंजली संस्थेने ‘करोनिल’ नामक आयुर्वेदिक औषध सादर करत या औषधाचे सेवन केलेले कोरोनाबाधित रुग्ण ३ ते ७ दिवसांच्या कालावधीत पूर्णपणे बरे झाले. तथा औषध सेवन केलेल्या एकाही बाधितांचा मृत्यू झाला नाही असा दावा करण्यात आला. मात्र आता या औषधाच्या जाहिरातीवर केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे बंदी घालण्यात आलीये.
जोपर्यंत या औषधाची आयुष मंत्रालयातर्फे चाचणी होत नाही तोपर्यंत आता पतंजलीला या कोरोनावरील ‘करोनिल’ औषधाची जाहिरात करता येणार नाही. भारतामध्ये कोणतेही आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यापूर्वी त्या औषधाला आयुष मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल मिळणे अत्यावश्यक असते. मात्र रामदेव बाबांच्या ‘करोनिल’ला अद्याप आयुष मंत्रालयाची परवानगी नसल्याने ही बंदी लादण्यात आली आहे.
AYUSH ministry orders Patanjali to stop advertising its COVID drug until “issue” is examined
— Press Trust of India (@PTI_News) June 23, 2020
AYUSH says advertisement of Patanjali’s alleged drugs regulated under Drugs and Magic Remedies (Objectionable Advertisements) Act, 1954
— Press Trust of India (@PTI_News) June 23, 2020