पुणे : कोरोना विषाणूची बाधा होईल, या भीतीने नरवीर तानाजी मालुसरे ( सिंहगड ) रस्त्यावरील धायरी येथील एका रिक्षाचालकाने कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केली.
अनिल बाबुराव खाटपे (५४, रा. बडदे चाळ, धायरी) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. गेल्या पाच दिवसांमधील ही शहरातील बारावी आत्महत्या आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह लगड मळ्याच्या पाठमागील कॅनॉल जवळील झुडुपात अडकल्याची माहिती एका नागरिकाने पोलिसांना दिली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला. मृत व्यक्तीच्या खिशात एक सुसाईड नोट आणि ड्रायव्हिंग लायसन्स आढळले आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन घटनेची माहिती दिली. कोरोना विषाणूची बाधा होईल, या भीतीनं आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोट लिहिले आहे,