पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नव्हता. पण बुधवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पालघर तालुक्यातील आठ नागरिकांना तर डहाणू तालुक्यात वैद्यकीय सेवेत असलेल्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
पालघर तालुक्यातील काटाळे या गावी वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबातील तीन वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली होती. मात्र त्या मुलीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा आणि येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. तिच्या संपर्कात आलेल्या 82 जणांचे रिपोर्ट स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्या मुलीच्या संपर्कात आलेल्या सात जणांना कोरोनाची लागण झाली.
काटाळे येथील वीट भट्टी संदर्भात पाच नवीन रुग्ण आढळले असून कासा येथील उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना (इंटर्न) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. तर सफाळे भागातील तीन जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आहे. मात्र हे रुग्ण मुलीच्या संपर्कातील नाही.