CoronaNews : राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचं करोनाने निधन

सोलापूर – राज्यात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱी देखील करोनाच्या दुसऱ्या सापडले आहेत. अनेक अनेकांना करोनामुळे जीव गमवावा लागत आहे. देशातील सर्वात ज्येष्ठ महिला नेमबाज चंद्रो तोमर यांचे काल निधन झाले. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्रातील पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा अशोक कुंभार यांचही करोनाने निधन झालं.

21 एप्रिलला सुनंदा यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घेतली होती. त्यावेळी त्यांच्या चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या. मात्र उपचारादरम्यान सुनंदा यांची वयाच्या 45 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. सुनंदा कुंभार यांच्या पश्चात पती, तीन मुले आणि नणंद आहेत. त्यांच्या मृत्युमुळे इतर कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

सुनंदा अशोक कुंभार या नोव्हेंबर 2000 पासून एसटीच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. त्यांनी उस्मानाबाद, तुळजापूर, बार्शी आणि सोलापूर या ठिकाणी वाहक म्हणून सेवा बजावली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.