“राधे’तील दुसरे गाणे झाले रिलीज

सलमानच्या “राधे’मधील “दिल दे दिया’ हे दुसरे गाणे आज रिलीज झाले. यामध्ये सलमान आणि जॅकलीन फर्नांडिस एकदम जबरदस्त परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. “राधे’तील पहिले गाणे “सिटी मार…’ दोनच दिवसांपूर्वी रिलीज झाले आहे. त्यामध्ये सलमान दिशा पाटणीबरोबर डान्स करताना दिसतो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


“सिटी मार…’ गाणे रिलीज झाल्यानंतर केवळ दोनच दिवसात या गाण्याला तब्बल 50 मिलीयन व्ह्यूज मिळाले आहे. या गाण्याचा जलवा अजून कमी झालेलाही नाही, तोपर्यंत सलमानचे आणखी एक गाणे रिलीज झाले आहे. यामध्ये जॅकलीन पारंपारिक वेशभुषेत आणि सलमान ब्लॅक सूटमध्ये दिसतो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

जेव्हा सलमानबरोबर काम करण्याची वेळ येते तेंव्हा त्याची एनर्जी अफाट असल्याचे लक्षात येते, असे जॅकलीनने म्हटले आहे. “सिटी मार’ आणि “दिल दे दिया’ या दोन्ही गाण्यांची प्रेक्षकांकडून तुलना होणे स्वाभाविक आहे. बऱ्याच दिवसांनी हिमेश रेशमियाचे संगीत आपल्याला या गाण्यातून ऐकायला मिळते आहे. “राधे’मध्ये सलमान व्यतिरिक्‍त जॅकलीन फर्नांडिस, दिशा पाटणी, रणदीप हुडा आणि जॅकी श्रॉफदेखील आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.