‘करोना लस पूर्णपणे सुरक्षित’

पुणे – “देशात तयार झालेली करोना लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगत आपल्या वैज्ञानिकांच्या क्षमता आणि देशातील मूल्यांकन यंत्रणेबाबत प्रश्‍न उपस्थित करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत, नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे,’ असा संदेश राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांनी दिला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये सोमवारी (दि.18) लसीकरण मोहीम झाली.

याचे उद्‌घाटन लेफ्टनंट जनरल मिस्त्री यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. या लसीकरण मोहिमेदरम्यान प्रबोधिनीतील सैन्य रुग्णालयाच्या 205 “त्रिशक्ती हीलर्स’ म्हणजेच प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

आगामी काळात खडकवासला आणि गिरीनगर मिलिटरी गॅरिसनमधील इतर नागरिकांनाही ही लस देण्यात येणार आहे.

यावेळी लेफ्टनंट जनरल मिस्त्री म्हणाले, “शत्रूशी लढा देण्यास सशस्त्र सेना नेहमीच अग्रणी राहिली, मग तो प्रत्यक्ष सीमेरेषेवरील शत्रू असो किंवा सूक्ष्मजंतू. हीच परंपरा कायम ठेवून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने करोनाशी तितक्‍याच नेटाने सामना केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.