सुरत – गुजरातमधील सुरतमध्ये भीषण अपघात झाला आहे. डंपरने रस्त्यालगतच्या फुटपाथवर झोपलेल्या १८ लोकांना चिरडले आहे. यामधील १५ जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार, सुरतमधील किम-मांडवी रस्त्यावरील फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना एका डंपरने मध्यरात्रीच्या सुमारास चिरडले आहे. हे सर्व मजूर राजस्थान येथील रहिवासी आहेत.
भरधाव असलेल्या डंपर चालक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ऊस ट्रॅक्टरने त्याला धडक मारली असता डंपर चालकाचे नियंत्रण सुटले आणि डंपर फुटपाथवर झोपलेल्या मजुरांवर पलटी झाला.
या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी आहेत. तर यामध्ये डंपरचा चालक आणि क्लिनरही गंभीर जखमी झाले आहेत.
Gujarat: 13 people died after they were run over by a truck in Kosamba, Surat.
Police says, “All the deceased are labourers and they hail from Rajasthan.” pic.twitter.com/E9uwZnrgeO
— ANI (@ANI) January 19, 2021