परिंचे -श्रीक्षेत्र वीर येथे करोना संशयित रुग्ण आढळला आहे. संशयितासह त्याच्या संपर्कातील नऊजणांना सासवड येथील कोविड सेंटरमध्ये हलवले असून संशयित रुग्ण व त्यांच्या पत्नीला पुण्यातील खासगी रुग्णालयात पाठविल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार यांनी सांगितले.
खासगी लॅबच्या अहवालानुसार रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले आहे. संशयित रुग्ण मुंबई पोलीस दलात शिपाई असून सांताक्रूझ येथील कलीना कॉलनीमधील रहिवासी आहेत. महिन्यांपूर्वी ते वीर येथे सुट्टीसाठी आले होते. त्यांना तातडीने मुंबई येथे बंदोबस्तासाठी बोलवले.
कलीनी कॉलनीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हा रुग्ण भीतीने खासगी वाहनातून शनिवारी (दि. 16) वीर येथे आले. दुसऱ्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेले होते. त्यांच्यामध्ये लक्षणे न दिसल्याने डॉक्टरांनी सांगितले. खासगी लॅबमध्ये तपासणी केली.