जामखेड -जामखेड पासूनच जवळच दहा किलोमीटर अंतरावरील मात्र बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मातावळीत एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मातावळी हे गाव जामखेडपासून जवळ असल्याने जामखेडसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
करोना काळात जामखेड शहरात 17 करोना रुग्ण आढळून आले होते. यानंतर तब्बल दिड महिन्यात एकही करोनाचा रुग्ण जामखेड शहरात सापडला नाही.
ही नागरीकांच्या दृष्टीने दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. गेल्या पंधरा दिवसांपासून जामखेडची बाजारपेठ सुरू झाली. एकीकडे बाजारपेठ सुरू झाली असली तरी दुसरीकडे जामखेड शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरील मात्र बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मातावळीत गावात रविवार एक रुग्ण मयत झाला आहे. याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला असुन हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच मुंबई येथुन मातावळीत आला होता.
गेल्या दिड महिन्यांपासून जामखेड शहरात अद्याप एकही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. मातावळी व आजुबाजुच्या गावातील लोक जामखेड शहरात येणार नाहीत. यासाठी चिंचपूर व जांबवाडी हे दोन रस्ते सील करण्यात येणार आहेत. यासाठी तलाठ्यांनी पहाणी करण्यासाठी पाठवले आहे. नागरीकांनी घाबरुन न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच गरज आसेल तरच घराबाहेर पडावे.
विशाल नाईकवाडे तहसीलदार