वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली येथील पानमळा परिसरामध्ये असणाऱ्या जेड रेसिडेन्सी परिसरातील सोसायटीमध्ये एक ३० वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. किडनी स्टोनची समस्या असल्याने सदरच्या व्यक्तीला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या उपचारादरम्यान कोरोनाची टेस्ट केली असता रिपोर्ट पॉजिटिव्ह आला.
सोसायटी परिसरामध्ये वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राने सर्व्हेक्षण करून ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली आहे. पॉजिटिव्ह व्यक्तीच्या पत्नीची व मुलीची चाचणी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत वाघोली गावामध्ये एकूण ८ रुग्ण सापडले आहेत. यापैकी चौघे पूर्णपणे बरे झाले आहेत तर इतर चौघांवर उपचार सुरु आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सोशल डीस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी केले आहे.