वाघोली (प्रतिनिधी) : केसनंद येथील ४८ वर्षीय कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतला आहे. घरी परतल्यानंतर केसनंद ग्रामस्थांच्या वतीने त्याचे जोरदार स्वागत करण्यात करून फुलांचा वर्षाव करण्यात आला. ग्रामस्थांच्या स्वागताने बरा झालेला रुग्ण भारावून गेला.
केसनंदमध्ये कोरोना पॉजिटिव्ह सापडलेली एकमेव व्यक्ती कोरोनावर मात करून घरी परतली असल्याने केसनंद कोरोनामुक्त झाले आहे. तरीदेखील प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जाणार आहे. प्रशासनाच्या वतीने कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येत असले तरी नागरिकांनी कोरोनापरिस्थिती टाळण्यासाठी सुरक्षितता बाळगून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शक्य होईल तेवढे प्रयत्न केले पाहिजे. गरम पाणी प्यावे, मास्क वापरावा, सोशल डीस्टन्सिंगचे बाहेर व घरात सुद्धा पालन करावे असे आवाहन कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाने केले आहे.