कोपरगाव : कोपरगाव तालुक्यासह शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून गेल्या 3 दिवसात 20 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने आत्तापर्यंत ५७ बाधीतांची नोंद झाली असुन बाधीतांपैकी एका महीलेचा या पुर्वीच मृत्यु झाला असुन ३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या 26 बाधीत रुग्णावर उपचार सुरू असुन त्यापैकी काही रुग्ण कोपरगाव येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये, 4 नगर येथील विळद घाटातील विखे पाटील कॉलेजमध्ये, 2 पुणे तर 1 नाशिक येथे उपचार घेत आहेत. बाधीत सर्व रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असुन शहरातील गांधीनगर येथी एका बाधीत रुग्णावर नाशिक येथे उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती काहीशी खालावली आहे अशी माहीती ती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
तालुक्यात दररोज कोरोनाबाधीत रुग्णांची साखळी वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या एका बड्या नेत्याच्या कुटूंबातील 4 सदस्यांना घरातील एका कामगारामुळे करोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली. संबधीत नेत्याने स्वतःसह इतरांच्या जीवाला धोका होवू नये म्हणुन घरकामगार करोनाबाधीत असल्याचे समजताच संपुर्ण कुटुंबातील सदस्यासह संपर्कातील व्यक्तींची करोना तपासणी खाजगी प्रयोगशाळेत करून घेतली. त्यात कुटुंबातील मुलगा, सुन व 2 नातवंडे बाधीत आढळले. प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करीत त्यांनी आपले सर्व कामकाज बंद ठेवून बंदीस्त करून घेतले आहे तर ते राहत असलेला परिसर प्रशासनाने सिल केला आहे.
3 दिवसात शहरातील बाधीतांची त व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. आत्तापर्यंत २६ लोकांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आहे. तर शहरातील काले मळा, चंद्रप्रभुनगय गा़धीनगर, साईसीटी, निवारा परिसर सिल करण्यात आला आहे अशी माहीती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.