मुंबई: शिवसेना सोडून भाजपचा झेंडा हाती घेतलेल्या शशिकांत चव्हाण यांनी पुन्हा हाती शिवबंधन बांधले आहे. माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शशिकांत चव्हाण हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. परंतु मध्यंतरीच्या काळात शिवसेनेपासून दूर जात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
रामदास कदम यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत परतले. त्यामुळे शिवसेनेची ताकद पुन्हा वाढल्याचे बोलले जात आहे. शशिकांत चव्हाण यांच्या खांद्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.