मुंबई – आजपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्रात संकटाचे ढग दाटले आहेत. अधिवेशनापूर्वी झालेल्या RTPCR चाचणीत आठ पोलिसांसह 10 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यापैकी दोघे विधिमंडळाचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
सत्र सुरू होण्यापूर्वी सुमारे 3500 लोकांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगबाबत निर्णय घेणे बाकी आहे. अधिवेशनापूर्वी या कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण मिळाले असून आतापर्यंत ओमायक्रॉनचे 65 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात मिळाले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.