बिजींग- निरोगी झालेल्या रुग्णांना कोरोना पुन्हा होत असल्याचे वुहानमधील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना आढळून आले आहे. मात्र, पुन्हा कोरोना होण्यामागचे कारण अजून शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना शोधता आलेले नाही.
कोरोनाला रोखण्यासाठी किंवा मारण्यासाठी जी औषधं वापरली जात आहेत, याचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा कदाचित हा व्हायरस विकसित होत असावा. त्यामुळे आता चीनसमोर वेगळेच आव्हान आहे.
दरम्यान, जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे मुख्य केंद्र चीनमधील वुहानमध्ये आहे. वुहान शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं असून या व्हायरसमुळे चीनमध्ये 3 हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे