मुंबई – चीनसह जगभरात हैदोस घालणाऱ्या करोना विषाणूने आता भारतात आपले पाय रोवले आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला करोनाची धडकी भरली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
याच पार्शवभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुख्य शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव आदी शनिवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
“राज्य शासनातर्फे खाजगी क्षेत्रातील सर्व कंपन्या आणि मालक यांना असे आवाहन करण्यात येत आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे सर्व कर्मचाऱ्यांना Work From Home ची परवानगी द्यावी.”
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/E31IzRnDld— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 13, 2020
तसेच नागरिकांनी मॉल, रेस्टॉरंट-हॉटेल्स, राजकीय कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम यांना जाणे टाळावे असे सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट दिसून येत आहे.
“ज्या व्यक्तींनी १५ फेब्रुवारी नंतर चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण या ७ देशांना भेट दिली असेल आणि आज संध्याकाळी ५:३० नंतर देशात विमानाने येतील त्यांना Quarantine वॉर्ड मध्ये ठेवण्यात येईल.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/Rf0W8gqMDh— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 13, 2020
दरम्यान, आता या निर्णयाचा फटका चित्रपटसृष्टीला बसल्याचे दिसून येत आहे. या शुक्रवारी दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले अभिनेता सुबोध भावेचा मुख्य भूमिका असलेला ‘विजेता’ आणि बिग बी अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांचा मुख्य भूमिका असलेला ‘एबी आणि सीडी’.
“जनतेला माझं नम्र आवाहन आहे की दिलेल्या सूचना आपण पाळल्यानंतर आपल्या उंबरठ्यावरचं हे संकट उंबरठ्यावरूनच परतून लावू हा आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे आणि मला खात्री आहे तोच आत्मविश्वास माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातसुद्धा आहे.”
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/KMTpqzMNWu— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 13, 2020
तर, हिंदी रूपेरी पडद्यावर अभिनेता इरफान खान आणि राधिका मदान यांच्या भूमिका असलेला ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे रसिकही सिनेमागृहांकडे वळले नसल्याचे चित्र जागोजागी दिसून आले.
“Apart from the 10th and 12th exams we are closing schools in Pimpri Chinchwad and Pune till further notice.”
-CM Uddhav Balasaheb Thackeray pic.twitter.com/gZsTMeh6pK— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 13, 2020
इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाने ओपनींगलाच केवळ 3.50 से 3.75 कोटी गल्ला जमवला आहे. त्यामुळे आता चित्रपट व्यवसायाला सुद्धा करॉनचा फटका बसला आहे.