रत्नागिरी – राज्यात करोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या 10 हजारांच्या खाली आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका डेल्टा व्हेरिएंटचा हॉटस्पॉट ठरत आहे. यामुळे आता जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात डेल्टा वेरिएंटचे रुग्ण सापडलेल्या संगमेश्वरमधील एका वाडीत कडक कंन्टेंटमेंट झोन करण्यात आल्याची माहिची जिल्हा शल्यचिकित्सक संगमित्रा फुले यांनी दिली.रत्नागिरी जिल्ह्यात एकाच वेळी 20 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये कंन्टेंटमेंट झोन करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 358 गावांमध्ये सध्या कन्टेंटमेंट झोन करण्यात आले आहेत.