corona – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत कोविडचे १६६ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील सक्रिय कोविड रूग्णांची संख्या ८९५ वर पोहोचली आहे.
आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी कोविड रूग्णांच्या संख्येने शंभराचा आकडा पार केला आहे. गेल्याकाही काळात नव्याने आढळून येणाऱ्या कोविड रूग्णांची संख्या अत्यल्प होती.
दरम्यान देशातील आत्तापर्यंच्या एकूण कोविड रूग्णांची संख्या ४ कोटी ५० लाख ३ हजार ५५ इतकी झाली आहे तर आत्तापर्यंत या रोगाने देशात ५ लाख ३३ हजार ३०६ रूग्ण दगावले आहेत.
देशात आत्तापर्यंत कोविड लसींचे २२० कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. कोविड रूग्णांच्या संख्येत धिम्या गतीने ही जी वाढ होते आहे त्यावर सरकारी यंत्रणांचे लक्ष आहे.