पुणे – जिल्ह्यासह राज्यातील घाटमाथ्यावर पावसाने पुन्हा जोरदार एंट्री केली आहे. गेल्या 24 तासांत निमगिरी येथे सर्वाधिक 166 मिमी पावसाची नोंद झाली. तर लोणावळा-118, खोपोली-103 तर धारावी परिसरात 107 मिमी पाऊस झाला.
कमी दाबाचा पट्टा आणि पश्चिमी वाऱ्यांची वाढलेली तीव्रता यामुळे घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. काही भागात ऑरेंज तर तुरळक ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
घाटमाथ्यावरील पाऊस (मिमीमध्ये) : लोणावळा-37, शिरगाव -35, शिरोटा-8, ठाकुरवाडी-12, वळवण -21, वाणगाव-18, अंबवणे -23, भिवपुरी -18, धावडी-28, डुंगरवाडी-40, कोयना-32, खोपोली-42, खंद-4, ताम्हिणी -56, भिरा-14.