पाचगणी – सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करत असताना राज्याच्या पोलीस दलाकडून सार्वजनिक गणेश मंडळात बॉम्ब स्कॉड व बॉंम्ब नाशक पथकाच्या सहाय्याने तपासणी केली जात आहे. पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर येथे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गणेश मंडळ व विसर्जन मिरवणूक मार्गांची सातारचे श्वान पथक, बॉम्ब शोधक व बॉंम्ब नाशक पथकाकडून तपासणी करण्यात आली.
या बॉम्ब स्कॉड व नाशक पथकात प्रामुख्याने संतोष शिंदे, पोलीस निरीक्षक संदीप भागवत, पोलीस कॉन्सटेबल नवनाथ शिंदे, वैभव भिलारे, अमोल पवार सहभागी होते. महाबळेश्वर पोलीस दलाकडून सार्वजनिक गणेश उत्सव शांतेत पार पाडण्याकरीता शांतता समितीची बैठक देखील घेण्यात आली आहे.