पंजाबमध्ये कॉंग्रेसच जिंकेल – अमरिंदर सिंग

चंदीगड – पंजाबमध्ये कॉंग्रेसच जिंकेल. मात्र, जर पंजाबमध्ये कॉंग्रेस हरली तर आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी जाहीर केले आहे.

सिंग म्हणाले की, पंजाबमध्ये कॉंग्रेस निवडणूक हरली तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. तसेच जो काही निकाल लागेल त्यासाठी सर्व मंत्री आणि आमदार जबाबदार असतील असेही सिंग म्हणाले.

अमरिंदर सिंग यांनी आपले तिकीट कापले असा आरोप नवज्योत सिंह यांच्या पत्नी व माजी आमदार नवज्योत कौर यांनी केला होता. हे आरोप सिंग फेटाळले आहेत. नवज्योत कौर यांना आपण अमृतसर आणि भठिंडाहून लढण्याची ऑफर दिल्याचे सिंग यांनी सांगितले. तसेच तिकीट वाटप हे दिल्लीहून होते असेही सिंग यांनी स्पष्ट केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×