शत्रुघ्न सिन्हा यांची कृती अयोग्य

पत्नीच्या प्रचारात भाग घेतल्याबद्दल कॉंग्रेस नेत्याची टीका

लखनौ – भाजपला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर स्वपक्षातील मंडळींनीच नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे लखनौ मतदारसंघातील उमेदवार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी शत्रुघ्न सिन्हा समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांचा प्रचार केला असल्याने खडे बोल सुनावले.

एकिकडे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शत्रुघ्न सिन्हा यांच्या रोडशोमध्ये सहभागी होऊन पक्ष धर्म पाळत त्यांना सन्मान देतात, मात्र शत्रुघ्न सिन्हा पक्ष धर्म पाळत नाहीत असे म्हणत निशाणा साधला आहे. शत्रुघ्न सिन्हा लखनौमध्ये आपल्याच पक्षाविरोधात प्रचार केला. यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी सिन्हा यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली.

भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये आलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना पाटणासाहिब मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा या समाजवादी पक्षाच्या तिकिटावरून लखनौमधून निवडणूक लढवत आहेत. शत्रुघ्न सिन्हा लखनौमध्ये कॉंग्रेस उमेदवार आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विरोधात पत्नीच्या प्रचारासाठी रोड शोमध्ये सहभागी झाले होते.
त्यामुळे शत्रुघ्न यांना पक्षधर्म पाळण्याचा सल्ला आचार्य प्रमोद कृष्णम यांनी दिला. सिन्हा यांनी कॉंग्रेस पक्षाचे असल्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशात कॉंग्रेसच्याच उमेदवाराचा प्रचार करायला हवा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)