तेजप्रताप यादव यांच्या गाडीवर हल्ला  

नवी दिल्ली  – सतराव्या लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान सुरु आहे. मतदानासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून, कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 59 जागांसाठी हे मतदान होत आहे. मात्र काही मतदान केंद्रावर हिंसाचार झाला आहे. यातच लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजप्रताप यादव यांच्या अंगरक्षक आणि पत्रकारांची मारहाण झाल्याची घटना समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,तेजप्रताप यादव यांच्या गाडीखाली फोटो जर्नालिस्टचा पाय आला यावेळी पत्रकारांनकडून विरोध केला गेला तेव्हा  अंगरक्षकांकडून मारहाण करण्यात आली.याबाबत तेजप्रताप यादव म्हटले,’माझ्या अंगरक्षकाने काहीही केलेलं नाही, उलट कॅमेरामननेच माझ्या गाडीचं नुकसान केलं.’ या संपूर्ण घटनेबाबत पोलीस कारवाई करीत आहे. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here