लखनौ – अभिनेत्री आणि 2018 मधील मिस बिकिनी इंडिया स्पर्धेतील विजेती अर्चना गौतम यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पाठोपाठ कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या “लडकी हूँ लढ सकती हूँ” या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक ठिकाणी महिलांना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये उन्नावमधील बलात्कार प्रकरणात बळी ठरलेल्या तरुणीच्या आई आशासिंग आणि हस्तिनापूरमधील उमेदवार अभिनेत्री अर्चना गुप्ता आणि “लडकी हूँ लढ सकती हूँ” या मोहिमेअंतर्गत चेहरा असलेल्या प्रियांका मौर्या यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यात कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या”लडकी हूँ लढ सकती हूँ” या मोहिमेअंतर्गत चेहरा असलेल्या प्रियांका मौर्या भाजपाच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जातंय. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार,’उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसच्या लडकी हूं, लड सकती हूं (मी मुलगी आहे, मी लढू शकते) या मोहिमेचा चेहरा असलेल्या प्रियंका मौर्या भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील होण्याची शक्यता आहे.”
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आल्याच्या काही दिवसांनंतर ही बातमी समोर आली आहे. त्यानंतर तिकीट वाटप प्रक्रियेत अनियमितता केल्याचा आरोप प्रियांका मौर्या यांनी केला होता.