मुंबई – बॉलिवूडचा किंग शाहरुख खान मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर होता. पण तरीदेखील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे शाहरुख चर्चेत होता.
3 ऑक्टोबरला क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तसंच इतर सात जणांना अटक करण्यात आली होती. यालयीन सुनावणी आणि एनसीबीकडून बरीच चौकशी केल्यानंतर आर्यनला 28 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला.
त्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आर्यनची 30 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली होती. आर्यनला तब्बल एक महिना तुरुंवास भोगावा लागला होता.
View this post on Instagram
दरम्यान, लाइमलाइटपासून दूर असलेल्या शाहरुखने आज (दि. 20) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तो एका टीव्ही कंपनीची जाहिरात करताना दिसतोय.
शाहरुखच्या फॅन्सने त्याच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.’किंग इज बॅक’, ‘लव्ह यू शाहरुख’ अशा कमेंट्स फॅन्स करत आहेत.