मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत, सध्या काँग्रेस पक्ष हा राहुल गांधी सुधारतील या आशेवर चालत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना घेरत, शरद पवार हे स्वतःला राष्ट्रवादी म्हणून घेतात, तर मग काँगेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम काढून टाकू असे म्हंटले आहे, ते त्यांना मान्य आहे का? असा प्रश्न यावेळी त्यांनी विचारला. भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेने स्वाभिमानाने युती केली असल्याचे सांगत, देश आणि धर्मासाठीच आपण लढत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. छ्त्रपती शिवाजी महाराज आजही हृदयामध्ये जिवंत असल्यानेच, त्यांची प्रेरणा घेऊन निघालो असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.