केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग स्पर्धा

पुणे – निखिल पराडकर (92धावा) याने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा 31 धावांनी पराभव करून येथे होत असलेल्या हेमंत पाटील प्रतिष्ठान यांच्या तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 50षटकात 8 बाद 249 धावा केल्या. यात निखिल पराडकरने सयंमपूर्ण खेळी करत 95 चेंडूत 12 चौकार व 1षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 92 धावा केल्या. निखिल पराडकर(92धावा) व अथर्व काळे(43धावा) यांनी पाचव्या गड्यासाठी 87 चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाला 249 धावांचे आव्हान उभे करून दिले.

याच्या उत्तरात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा डाव 40.2षटकात 218 धावावर संपुष्टात आला. यामध्ये सुरुवातीला विशाल गीतेने 45 चेंडूत 65धावा व सुधांशू गुंडेतीने 60 चेंडूत 42धावा करून चांगली सुरुवात करून दिली. पण हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर विनय पाटीलच्या 24धावा, कार्तिक पिल्लेच्या 24धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही.

केडन्स संघाकडून सिद्धेश वरघंटीने 39 धावांत 4 गडी बाद करून संघाच्या विजयाचा पाया रचला. सिद्धेशला अक्षय वाईकर(2-21) व सईद इझान(2-38)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून सुरेख साथ दिली.सामनावीर हा ‘किताब निखिल पराडकर याला देण्यात आला.

सविस्तर निकाल : साखळी फेरी :

केडन्स क्रिकेट अकादमी: 50षटकात 8 बाद 249 धावा(निखिल पराडकर 92(95,12 चौकार,1षटकार), अथर्व काळे 43(72,2चौकार, 2षटकार), हर्षल काटे 21(19), गणेश गायकवाड 17, सईद इझान 15, शुभम तैस्वाल 3-34, विनय पाटील 1-28, हर्षवर्धन पाटील 1-33, कार्तिक पिल्ले 1-58) वि.वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 40.2षटकात सर्वबाद 218 धावा(विशाल गीते 65(45,2चौकार,7षटकार), सुधांशू गुंडेती 42(60,6चौकार), विनय पाटील 24(28), कार्तिक पिल्ले 24(28), सिद्धेश वरघंटी 4-39, अक्षय वाईकर 2-21, सईद इझान 2-38);सामनावीर-निखिल पराडकर.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)