बेंगळुरू :- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी तसेच मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे रविवारी सत्कार करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, सिद्धरामय्या बेंगळुरू येथून कोल्हापूरला जातील, तेथून ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सांगलीला जातील.
दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर सिद्धरामय्या यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असेल. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांच्या निमंत्रणावरून ते बारामतीला रवाना होतील असे मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.