मुंबई – सध्या सगळीकडे रामायणावर आधारलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचीच चर्चा रंगली असल्याचं दिसून येत आहे. 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे.
‘आदिपुरुष’चं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘आदिपुरुष’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कुठे प्रेक्षक चित्रपटावर टीका करत आहेत. तर कुठे चित्रपटविरोधात नेटकरी देखील सोशल मीडियावर आक्रम झाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, आता सिनेरसिकांनी ‘आदिपुरुष’कडे पाठ फिरवली असल्याचं दिसून येत आहे. सिनेमाच्या कमाईचा वेग आता मंदावताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होवून एक आठवडा पूर्ण झाला आहे. प्रदर्शनानंतर काही दिवस चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळाला पण आता चित्रपाच्या कमाईला चांगलाच ब्रेक लागला आहे.
प्रदर्शनानंतर हा चित्रपट सतत वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ज्यामुळे निर्माते, दिर्गर्शक आणि लेखकांना उत्तरं द्यावी लागत आहेत. आणि त्याचच परिणाम आता चित्रपटाच्या कमाईवर दिसून लागला आहे. सध्या चित्रपटाच्या डायलॉगवरून अनेक वाद होताना दिसत आहेत. ‘आदिपुरुष’ने गुरुवारी फक्त 5.5 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.
आतापर्यंत भारतात चित्रपटाने 260. 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरात सिनेमाने 400 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. अशात चित्रपट येत्या काही दिवसांत किती रुपयांपर्यंत मजल मारू शकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 500 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे.