नवी दिल्ली – वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे आणि कसोटी फॉरमॅटसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. यशस्वी जयस्वाल आणि रुतुराज गायकवाड यांना पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याच वेळी, चेतेश्वर पुजाराला यावेळी कसोटी संघातून विश्रांती देण्यात आली आहे.
रुतुराज-यशस्वी यांना संधी
IPL 2023 आणि देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी रुतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांना संधी देण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमात यशस्वीची कामगिरी उत्कृष्ट होती आणि त्याने 14 सामन्यांमध्ये एकूण 625 धावा केल्या. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जला पाचव्यांदा चॅम्पियन बनवण्यातही रुतुराजने महत्त्वाची भूमिका बजावली.
पुजारा-उमेशवर पडला
चेतेश्वर पुजाराला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये हव्या तशा फॉर्मात नव्हता. त्यामुळे निवड समितीने पुजाराला कसोटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पुजारासह उमेश यादवलाही संघातून वगळण्यात आले आहे.
संजू सॅमसन आणि उमरान परतले
संजू सॅमसनला पुन्हा एकदा IPL 2023 मध्ये चांगली कामगिरी केली होती. वेस्टइंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या वनडे संघात सॅमसनचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमात चेंडूने काही खास दाखवले नसतानाही उमरान मलिकला वनडे फॉर्मेटसाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
मुकेशला संधी, सैनीचे पुनरागमन
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही संघांमध्ये मुकेश कुमारचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएल 2023 मध्ये मुकेशची कामगिरी दमदार होती. यासोबतच नवदीप सैनीचेही प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. नवदीपने शेवटचा कसोटी सामना २०२१ मध्ये खेळला होता.
रहाणे पुन्हा उपकर्णधार
अजिंक्य रहाणेला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीचे फळ मिळाले आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. रहाणेची पुन्हा कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रहाणेने डब्ल्यूटीसी फायनलच्या दोन्ही डावांत चांगली कामगिरी केली होती.
असा असेल कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन,मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी,रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल.
वनडे टीम
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली,कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, हार्दिक पंड्या (VC), शार्दुल ठाकूर, आर. जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, उमरान मलिक, मुकेश कुमार,सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (W).