मुंबई- गायक सोनू निगम नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. त्याच्या एका वक्तव्यामुळे नेहमी नव्या वादाला तोंड फुटतं. यावेळी सुद्धा त्यांची जीभ सगळ्यांसमोर घसरली. त्यामुळे गायक क्षेत्रात कदाचित नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
‘ईश्वर का वो सच्चा बंदा’ या गाण्याच्या प्रदर्शनाच्या वेऴी माध्यमांशी बोलताना त्याची जीभ घसरली. त्याने केलेलं वक्तव्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. ‘खरं सांगायचं झालं तर त्याने गायक व्हावं अशी माझी बिलकूल इच्छा नाही आणि झाला तरी या देशात नको.’ असं वादग्रस्त वक्तव्य त्याने त्याच्या मुलाच्या भविष्याबद्दल केलं आहे.
तो आता भारतात राहत नाही. त्याला आधीच दुबईला पाठवण्यात आलं आहे. याक्षणी, माझा मुलगा युएईचा सर्वोच्च गेमर आहे. एक खेळ फोर्टनाइट आहे आणि तो त्याचा टॉप गेमर आहे. त्यामुळे मोठा होवून तो काय होईल, त्याची निवड तो स्वतःकरेल असं देखील तो म्हणाला.
दरम्यान, सोनु आणि त्याच्या मुलाचे अनेक व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यातील अनेक व्हीडियोंना लोकप्रियता मिळाली मात्र या वक्तव्यामुळे ही लोकप्रियता कमी होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.