Congress MLA Death Threat : महाराष्ट्रातील काँग्रेसचे( Congress) आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव गोल्डी ब्रार असे सांगितले आहे. काँग्रेस आमदाराला दोन वेळा धमकीचे फोन आले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
काँग्रेस आमदार (Congress)अस्लम शेख यांच्या स्वीय सहाय्यकाला दोन वेळा धमकीचे फोन आले. फोनवरील व्यक्तीने मी गोल्डी ब्रारला बोलत असून अस्लम शेखला 2 दिवसातगोळ्या घातल्या जाणार असल्याचे म्हटले. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
लवकरच त्या व्यक्तीची ओळख पटवली जाईल. हा फोन कॉल अस्लम शेख यांचे स्वीय सहाय्यक आणि वकील विक्रम कपूर यांना आला होता. त्यावेळी मुंबई महापालिकेच्या कार्यालयात काँग्रेसचे आमदार अस्लम शेख उपस्थित होते.