मुंबई – अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) मागील काही वर्षांपासून ‘चला हवा येऊ द्या’ या शोद्वारे प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. विनोदाच्या अचूक शैलीमुळे तिचे नेहमीच कौतुक केले जाते. याशिवाय श्रेया सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक गोष्टींबाबत ती सोशल मीडियावर माहिती देत असते. नुकतेच श्रेयाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्रेया बुगडेने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याबरोबर तिच्या हातात पर्स, डोळ्याला काळा गॉगल आणि केसांचा आंबाडा असा लूक केल्याचे पाहायला मिळत आहे. तिने शेअर केलेला फोटो विमानतळावरील आहे. तिच्या या एअरपोर्ट लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तेरे बिन सानु सोह्निया, कोई होर नहियो लभना….. मी जेव्हा विमानतळावर येते, तेव्हा माझ्या याच भावना असतात.”
Instagram पर यह पोस्ट देखें
सध्या तिच्या या फोटोला चाहत्यांची प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. श्रेयाच्या या फोटोवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी “आज कुठे सकाळी सकाळी नटून थटून??” असे कमेंट करत लिहिले आहे. दरम्यान, श्रेया नेहमीच वेगवेगळ्या लुकमध्ये पाहायला मिळते. मात्र तिचे खास लुक नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. सध्या तिच्या या साध्या फोटोशूटला देखील चाहत्यांची पसंती मिळत आहे.