काँग्रेसमुळे देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढतेय- मायावती

नवी दिल्ली: बहुजन समाज पक्षाला खिंडार पाडण्याला सुरवात झाली आहे. राज्यस्थान मध्ये बसपा च्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिट्टी देत काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर मायावती चांगल्याच संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या ट्विटर वरून काँग्रेस वर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसमुळे देशात जातीयवादी शक्ती वाढत असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे.

त्या म्हणाल्या आहेत की,”काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी भूमिकेमुळे देशात जातीयवादी शक्ती मजबूत होत आहेत. त्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्ष अशा जातीयवादी, सांप्रदायिक शक्तींना कमकुवत करण्याऐवजी त्या शक्तींविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच कमकुवत करण्यात गुंतली आहे. त्यामुळे जनतेने सावध राहिले पाहिजे.”

दरम्यान बसप आमदारांच्या पक्षांतरानंतर मायावती म्हणाल्या होत्या की, काँग्रेसने बसपच्या आमदारांना फोडून काँग्रेस किती दगाबाज पक्ष आहे हे दाखवून दिले आहे. तसेच आमदारांचे पक्षांतर म्हणजे बसपा चळवळीसोबत झालेला विश्वासघात आहे. असेही त्या म्हणाल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.