VidhanSabhaElection: शरद पवारांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा

बीड जिल्ह्यात विधानसभेसाठी युवा नेतृत्वाला संधी; जयदत्त क्षीरसागर यांच्यावर सडकून टीका

बीड: बीड जिल्ह्यांतील पाच विधानसभा मतदारसंघांमधील भावी उमेदवारांची नावे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली आहेत. बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान, त्यांनी शिवसेनेत गेलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर सडकून टीका केली.

परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे, बीड मतदारसंघातून संदीप क्षीरसागर, गेवराईतून विजयसिंह पंडीत, माजलगावमधून प्रकाश सोळंकी आणि केजमधून नमिता मुंदडा यांच्या उमेदवारीवर पवार साहेबांनी शिक्कामोर्तब केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत युवावर्गाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पक्षातर्फे आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्याची सुरूवात आज बीड येथून करण्यात आली आहे. तसेच आष्टी येथील उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.