Congress -BJP । देशात आगामी लोकसभा निवडणूका पार पडणार आहेत. त्यानुसार प्रत्येक पक्ष आपापल्या परीने जोरदार प्रचार करत आहेत. मात्र दुसरीकडे देशातील मोठ्या पक्षात मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसतंय. मध्य प्रदेशातील काँग्रेसमध्ये नाराजी असून काही दिग्गज नेते भाजपच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा समोर आल्या होत्या. मात्र आता पंजाबमधून मोठी बातमी समोर येतय. प्राप्त माहितीनुसार, पंजाबमधील आनंदपूर साहिब येथील काँग्रेसचे खासदार मनीष तिवारीही भाजपच्या संपर्कात असून ते पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
हेही वाचा
Congress । चव्हाणांनंतर काँग्रेसला आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांचा रामराम? लेकासह भाजप…
यावेळी मनीष तिवारी भाजपच्या निवडणूक चिन्हावर लुधियाना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित असल्याचे बोलले जातय. लुधियानाच्या जागेवर पक्षाकडे सक्षम उमेदवार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. मनीष तिवारी यांच्या भाजपमध्ये प्रवेशाने जागेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
कोण आहेत मनीष तिवारी? Congress -BJP ।
मनीष तिवारी हे फक्त खासदार नाहीत तर वकील देखील आहेत. 17 व्या लोकसभेत ते पंजाबमधील आनंदपूर साहिब येथून काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले. यूपीए सरकारच्या काळात ते 2012 ते 2014 पर्यंत माहिती आणि प्रसारण मंत्री आणि 2009 ते 2014 पर्यंत लुधियानाचे खासदार होते. यूपीए सरकारच्या काळात ते काँग्रेसचे प्रवक्तेही होते.
तिवारी हे 1988 ते 1993 पर्यंत भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते. 1998 ते 2000 पर्यंत भारतीय युवक काँग्रेस (I) चे अध्यक्ष होते. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत ते हरले पण 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवाराचा पराभव करून विजयी झाले. मार्च 2014 मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती.