Lok Sabha Elections 2024 6th Phase Voting Live Updates: लोकसभा निवडणूक 2024 च्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. आज 8 राज्यांतील लोकसभेच्या 58 जागांवर मतदान होत असून, सकाळी ठीक 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. आज मतदान होत असलेल्या 8 राज्यांतील 58 जागांसाठी एकूण 889 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे, त्यापैकी 8 पश्चिम बंगाल, 10 हरियाण, 7 दिल्ली, 4 झारखंड. जम्मू-काश्मीरमधील 1, ओडिशातील 6, उत्तर प्रदेशच्या 14 आणि बिहारच्या 8 जागांचा समावेश आहे.
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये 77.99 –
निवडणूक आयोगाने सायंकाळी 5 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी जाहीर केली आहे. सकाळपासून पश्चिम बंगाल आघाडीवर आहे, येथे सर्वाधिक 77.99 टक्के मतदान झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी 51.35 टक्के मतदान झाले. एकूण 58 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झाले आहे.