पिंपरी चिचंवड मध्ये लोकन्यायालयाचे आयोजन

पिंपरी : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी पिंपरी येथील न्यायालयात तसेच आकुर्डी येथील पिंपरी चिचंवड महानगरपालिका न्यायालय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी न्यायालयात 142 खटले निकाली काढले तर तडजोड शुल्क व दंड स्वरूपात 1 कोटी 79 लाख 8 हजार 749 वसुली झाली. आकुर्डी न्यायालयात एकूण 1 हजार 430 प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर दंड व विविध करांच्या स्वरूपात 11 कोटी 51 लाख 87 हजार 586 रूपयांची वसुली झाली. सदर कार्यक्रमात न्यायालयातील मुख्य न्यायाधीश ए.यु. सुपेकर, सहन्यायाधीश एन. टी.भोसले, सहन्यायाधीश डी.आर.पठाण, सहन्यायाधीश आर एन मुजावर यांच्या उपस्थितीत तर आकुर्डी न्यायालयामध्ये मे. एस. बी. देसाई यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष ऍड.सतीश गोरडे होते. पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड. दिनकर बारणे, उपाध्यक्ष ऍड.अतुल अडसरे, सचिव ऍड.हर्षद नढे, महिला सचिव सुजाता बिडकर, सहसचिव ऍड.पूनम राऊत, खजिनदार ऍड.सागर अडागळे, ऑडीटर ऍड.सुजाता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.