पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध करण्यासाठी शनिवारी पश्चिम बंगालच्या काही भागात शनिवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार मुर्शिदाबाद आणि उत्तर परगाणा जिल्ह्यात संतप्त नागरिकांनी रेल्व स्थानक, एसटी स्थानकाला पेटवून दिले आहे.

हावड्यातील मुंबई रोड, दिल्ली रोड या द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. काही शहरामध्ये संचारबंदी स्थितील करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन शांततेत निषेद करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. हिंसाचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.